भारतीय बौद्ध महासभा नांदेडच्या विद्यमाने अशोका विजयादशमी /धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा
व्हिजन २४ तास न्यूज
नांदेड / अर्धापूर :- (उध्दव सरोदे )
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड यांच्या विद्यमाने नांदेड जिल्हा व सर्व तालुक्यात ता.२० आक्टोबर मंगळवार रोजी सम्राट अशोका विजयादशमी/धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा रेल्वे स्टेशन जवळ सकाळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास सर्वप्रथम पुष्पांजली अर्पण करून पंचशील धम्म ध्वजाचे ध्वजारोहण भारतीय बौद्ध महासभेचे नांदेड जिल्हाध्यक्ष गणपतराव गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बौद्ध महासभा जिल्हा नांदेडच्या पदाधिकाऱ्यांनी धम्मध्वज गाथा,त्रिशरण पंचशील,पुजा पाठ,भिमस्मरण,भिमस्तुती, आशीर्वाद गाथा व सरणोत्तर गाथा आदी गाथा ग्रहण करून अभिवादन करण्यात केले.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेडचे अध्यक्ष हौसाजी वारघडे,रेखाताई पंडित,अनिता खंदारे,दामोदर सरकटे,बि.डी. कांबळे,युवराज मोरे,रविकिरण जोंधळे,जिल्हा संघटक तथा पत्रकार उध्दवराव सरोदे,सुरेश लोकडे,ईश्वर जोंधळे,जनार्दन जमदाडे,समता सैनिक दलाचे कृष्णा गजभारे,सोपान गायकवाड, समता सैनिक दल जवान,बौद्ध महासभा नांदेडचे सर्व पदाधिकारी यांच्या सह बौध्द उपासक, उपासिका,बालक,बालिका व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

