माणदेशी न्यूजचा तेजस्विता दिवाळी अंक प्रकाशित ग्रामीण साहित्यिकांना नवी दिशा — मा. नगराध्यक्ष नितीन दोशी
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
सचिन मंगरुळे
म्हसवड :-प्रतिनिधी
ग्रामीण भागातील नवोदित लेखक व कवी यांना प्रेरणा आणि व्यासपीठ देणारा माणदेशी न्यूजचा दर्जेदार ‘तेजस्विता’ दिवाळी अंक प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
म्हसवड येथील मोफत नगर वाचनालय सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष नितीन दोशी यांच्या हस्ते अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
या वेळी बोलताना दोशी म्हणाले, “ग्रामीण साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी संपादक विजय टाकणे यांनी सलग १५ वर्षे हा दिवाळी अंक प्रकाशित करून ग्रामीण लेखकांचा आत्मविश्वास वाढवला आहे. या अंकामुळे वाचकांना ग्रामीण वास्तव, विचार आणि अनुभूती यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो.”
कार्यक्रमाला नगरसेवक गणेश रसाळ, इंजिनिअर सुनील पोरे, लेखक अजित काटकर, नगरसेवक विकास गोंजारी, संपादक प्रसाद कडव, पत्रकार राहुल खरात, विलास खरात, डॉ. राजेंद्र मोडासे, विक्रमवीर (मुसाभाई) मुल्ला, राजकुमार डोंबे, इम्रान मुल्ला, सुशील त्रिगणे, राजेश इनामदार, शांताराम टाकणे, भारत पिसे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात इंजिनिअर सुनील पोरे, गणेश रसाळ, डॉ. राजेंद्र मोडासे आणि लेखक अजित काटकर यांनीही आपली मनोगते व्यक्त करत माणदेशी न्यूजच्या उपक्रमाचे कौतुक केले.
या प्रसंगी मुसाभाई मुल्ला यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित मान्यवरांना साहित्यभूमी वतीने सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे आभार सुशील त्रिगणे व राजकुमार डोंबे यांनी मानले.

