म्हसवडमध्ये “Tattoo Studio” नितीनशेठ दोशी यांचे हस्ते उद्घाटन

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला

म्हसवड (प्रतिनिधी)

म्हसवड शहरातील युवा पिढीला आधुनिकतेचा आणि कला-जागराचा संगम अनुभवायला मिळावा यासाठी म्हसवडचे युवा उद्योजक आकाश जैन यांनी स्थापन केलेल्या “Tattoo Studio” या नूतन शॉपचे भव्य उद्घाटन म्हसवड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन मा. नितीनभाई दोशी यांच्या शुभहस्ते नुकतेच संपन्न झाले.

यावेळी बोलताना मा. नितीनभाई दोशी म्हणाले की,
> “आजच्या तरुणाईमध्ये स्वतःच्या व्यक्तिमत्वाला वेगळी ओळख देण्याची ओढ वाढली आहे. त्यातूनच टॅटू ही एक नावीन्यपूर्ण कला म्हणून लोकप्रिय झाली आहे. म्हसवड आणि पंचक्रोशीत हे पहिलेच टॅटू स्टुडिओ सुरू झाले आहे, ही अभिमानास्पद बाब आहे. शहरातील तरुण-तरुणींनी या संधीचा नक्कीच फायदा घ्यावा.”
या नव्या उपक्रमामुळे म्हसवड शहरात आधुनिक कला, फॅशन आणि डिझाईनचा नवा अध्याय सुरू झाला असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या प्रसंगी अहिंसा पतसंस्थेचे संचालक आणि यशस्वी उद्योजक अनिल गाडे, नंदकुमार गाडे, मा. बंडू टाकणे, युवा उद्योजिका अर्चना रसाळ, तसेच गाडे कुटुंबीय आणि शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटन प्रसंगी Tattoo Studio चे संस्थापक आकाश जैन यांनी उपस्थितांचे आभार मानत सांगितले की,

“ही कला म्हणजे केवळ शरीरावरचा रंग नाही, तर व्यक्तिमत्वाची ओळख आहे. म्हसवडसारख्या प्रगतिशील शहरात युथला नव्या स्टाइल आणि क्रिएटिव्हिटीचा अनुभव देण्यासाठी हे स्टुडिओ सुरू केले आहे.”
या ठिकाणी अत्याधुनिक मशीनरी, स्वच्छता व सुरक्षा याची पूर्ण काळजी घेतली गेली असून सर्व डिझाईन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कलाकारांकडून तयार केल्या जाणार आहेत.

नूतन Tattoo Studio च्या उद्घाटनामुळे म्हसवड शहरात युवा कलाविश्वाला नवा आयाम लाभला असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *