म्हसवड शहरातील नामांकित व्यक्तिमत्व कै. भारत (पंच) शिंदे यांचे निधन
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड │प्रतिनिधी
म्हसवड शहरातील एक नामांकित व सर्वप्रिय व्यक्तिमत्व कै. श्री. भारत अनंता शिंदे (भारत पंच) वय ६० यांचे अपघातानंतर उपचारादरम्यान बुधवार दि. ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कै. भारत शिंदे हे आपल्या मनमिळावू स्वभावामुळे सर्व स्तरातील लोकांमध्ये लोकप्रिय होते. सामाजिक क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाची नोंद शहरवासीयांच्या मनात सदैव राहील.
त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, पत्नी, पाच भाऊ व पाच बहिणी असा मोठा परिवार आहे.
त्यांचा रक्षाविसर्जन शुक्रवारी दिनांक १० ऑक्टोबर रोजी सकाळी ७:३० वाजता म्हसवड येथील स्मशानभूमी येथे पार पडणार आहे.
🕯️ ईश्वर त्यांच्या मृतात्म्यास चिरशांती देवो.
💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐
–

