चारित्र्यावर संशय घेत पतीकडून पत्नीचा खून, नंतर आत्महत्या

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड प्रतिनिधी
माण तालुक्यातील हिंगणी येथील हिंगणी राजेवाडी रस्त्यावर असलेल्या आसाळवाडा जि.प.शाळेच्या पाठीमागे असलेल्या घुटुकडे वस्तीवरील बंडू अंकुश घुटुकडे याने आपली बायको अनिता बंडू घुटुकडे हिला चारित्र्याच्या संशयावरून जीवे मारून स्वतःच्या गळ्याला देखील फास लावून जीव दिल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास हिंगणी येथे घडली आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या सविस्तर माहितीच्या आधारे नवरा बायकोच्या भांडणातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ही घटना घडताच पोलीस पाटील संतोष खडतरे यांना याबाबत माहिती समजताच त्यांनी तात्काळ म्हसवड पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्याशी संपर्क साधला. यानंतर लगेचच म्हसवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

       दरम्यान दहिवडी उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित सावंत हेही घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी केलेल्या पाहणीनुसार बायको झोपेत असताना मयत बंडू घुटुकडे याने दगड फोडण्यासाठी वापरला जाणारा हातोडा(घन)
बायकोच्या डोक्यात घातला. त्यानंतर बायको मृत झाल्याची खात्री करून स्वत:चा ट्रॅक्टरचा रबरी पट्ट्याने गळा आवळला आणि स्वतःचे देखील जीवन संपवले.
        एकूणच या घटनेचा उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वात श्वान पथक, ठसेतज्ञ, आणि फॉरेन्सिक टीमच्या मदतीने म्हसवड पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *