अर्धापूर तालुका पत्रकार संघाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
उध्दवराव सरोदे
नांदेड (अर्धापूर) :-प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या अर्धापूर तालुका शाखेचे नवनियुक्त तालुकाध्यक्ष उध्दवराव सरोदे तसेच कार्यकारिणी सदस्यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे पदवीधर सेलचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस व जिल्हा चिटणीस तथा अर्धापूर अधिवक्ता संघाचे तरुण व तडफदार विधिज्ञ अॅड. सचिन सदाशिवराव देशमुख यांच्या वतीने करण्यात आला.

हा सत्कार कार्यक्रम अर्धापूर न्यायालयासमोरील अॅड. देशमुख यांच्या कार्यालयात पार पडला. यावेळी तालुकाध्यक्ष उध्दवराव सरोदे, बिबिशन कांबळे, अॅड. गौरव सरोदे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

या प्रसंगी अधिवक्ता संघ अर्धापूरचे सदस्य अॅड. ए.जी. राजेगोरे, अॅड. मंगेश सरोदे आदी मान्यवर उपस्थित होते.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *