सेवा पंधरवडा अंतर्गत म्हसवड येथे महाराजस्व समाधान शिबिर
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड (प्रतिनिधी) :
राज्य शासनाच्या सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत म्हसवड- विरकरवाडी रोडवरील हरीओम मल्टीपर्पज हॉल येथे करण्यात आले आहे.
या शिबिरास ग्रामविकास व पंचायत राज मंत्री मा. ना. श्री. जयकुमार गोरे तसेच जिल्हाधिकारी सातारा मा. श्री. संतोष पाटील प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
शिबिरामध्ये नागरिकांना विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ मिळणार असून त्यात पुढील कामांचा समावेश आहे –
स्थायिक (डोमासाईल) दाखले
उत्पन्न व जातीचे दाखले
संजय गांधी निराधार योजना अर्ज व मार्गदर्शन
नवीन रेशन कार्ड वाटप व दुबार कार्ड रद्द करणे
वारस नोंदी नोंदणी
आरोग्य तपासणी शिबीर व आयुष्यमान भारत कार्ड वाटप
शेतकरी कार्ड काढणे
आधार कार्ड संदर्भातील कामकाज
कृषी विभागाच्या विविध योजना
पंचायत समिती व नगर परिषद म्हसवड यांच्या योजनांची माहिती व सुविधा
घरकुल योजना
या शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना शासनाच्या सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. शेतकरी, कामगार व सर्वसामान्य नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

