जमीर नदाफ यांची RPI(A) गटाच्या जिल्हा वाहतूक संघटना उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
कुलदीप मोहिते
कराड :-प्रतिनिधी
कराड येथे आज झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) गटाच्या मेळाव्यात जमीर नदाफ यांची सातारा जिल्हा वाहतूक संघटनेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीची घोषणा RPI(A) गटाचे जिल्हाध्यक्ष राज चव्हाण यांनी केली.

जमीर नदाफ हे कायमच सामाजिक कार्यात अग्रेसर राहिले आहेत. त्यांनी गरजू आणि गरीबांसाठी वेळोवेळी मदतीचा हात पुढे केला आहे. महसूल विभागाशी संबंधित सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर उपाययोजना व्हाव्यात म्हणून त्यांनी आंदोलने केली तसेच तहसीलदार कार्यालयावर मोर्चेही काढले आहेत.

कोरोना महामारीच्या कठीण काळात जेव्हा लोक एकमेकांच्या जवळ जाण्याचे टाळत होते, त्याच वेळी नदाफ यांनी भीती न बाळगता स्मशानभूमीत कोरोना बाधित मृतांना अग्नी देण्याचे धाडसी कार्य केले होते. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत आज त्यांची जिल्हा वाहतूक संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

या वेळी RPI(A) गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे, सचिव डॉ. मोहनलाल पाटील, जिल्हाध्यक्ष राज चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जमीर नदाफ यांच्या निवडीमुळे सातारा जिल्ह्यातील RPI(A) गटाला नवी ऊर्जा मिळाल्याचे मत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *