हिंगणोळेची श्रद्धा इंगळे राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत दोन सुवर्णं पदके

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
कुलदीप मोहिते
कराड:प्रतिनिधी
शटलर्स बॅडमिंटन अकॅडमीतील खेळाडू आणि हिंगणोळे गावची कन्या श्रद्धा प्रशांत इंगळे हिने राज्यस्तरीय स्पर्धेत दोन सुवर्णपदके पटकावून कराड तसेच उंब्रज परिसराचा मान वाढवला आहे.

Oplus_16908288

कै. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार मेमोरियल महाराष्ट्र मिनी राज्य सिलेक्शन बॅडमिंटन स्पर्धा चंद्रपूर येथे 10 ते 14 सप्टेंबर 2025 दरम्यान झाली. या स्पर्धेत सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना श्रद्धा इंगळे हिने मुलींच्या 13 वर्षे वयोगटात एकेरी व दुहेरी अशा दोन्ही प्रकारात विजेतेपद पटकावले. तिच्या या यशामुळे ती राज्यात द्विराज्ञी ठरली.

या स्पर्धेत जळगावच्या ओवी पाटील हिने दुसरा क्रमांक मिळवला. श्रद्धाला प्रशिक्षक निलेश फणसळकर आणि ओंकार पालकर यांचे मार्गदर्शन लाभले.

श्रद्धाच्या या भरीव कामगिरीबद्दल गावातील तसेच समाजातील मान्यवरांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *