भुईंज पोलीस यांची कारवाई मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड करुन रुपये 20,000 किंमतीची मोटारसायकल जप्त.

बातमी Share करा:

 गोंदवले( खुर्द) ;   प्रतिनिधी  ( सादिक शेख  )
                  मौजे देगांव ता. वाई गावच्या हद्दीत श्री प्रताप रामचंद्र पंडीत यांचे राहते घरासमोर लावलेली त्यांचे
मालकीची हिरो होंडा स्प्लेंडर कंपनीची २०,००० /- रुपये किमतीची मोटार सायकल क्रमांक एम. एच. ११
बी.ई.५६४० ही दिनांक २८/१२/२०२२ रोजी सायंकाळी ७.०० ते दिनांक २९ / १२ / २०२२ रोजीचे सकाळी
०६.३० वा.चे दरम्यान चोरीस गेलेबाबत त्यांनी दिले फिर्यादीवरुन अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल
करणेत आलेला आहे.
सदर गुन्हयाचे तपासकामी श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्री बापू बांगर, अप्पर पोलीस
अधीक्षक सातारा, श्री गणेश किंद्रे, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई, भुईंज पोलीस ठाणेचे प्रभारी
अधिकारी श्री रमेश गर्जे, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली भुईंज पोलीस ठाणेकडील अंमलदार
यांचे खास पथक तयार करण्यात आले होते. सदर पथकाने घटनास्थळावरील सी.सी.टी.व्ही फुटेजची
पडताळणी करून तसेच गावात गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळवली असता सदरचा गुन्हा देगाव
गावातीलच एका संशयीत इसमाने केला असल्याबाबत विश्वसनीय बातमी प्राप्त झाली. त्याप्रमाणे सदर पथकाने
दिनांक १४/०१/२०२३ रोजी भुईंज परिसरातुन शिताफीने ताब्यात घेवुन त्यास सदर गुन्हयात अटक करून
त्याचेकडून २०,०००/- रुपये किमतीची चोरीस गेलेली हिरो होंडा स्प्लेंडर मोटार सायकल क्रमांक एम.एच.११
बी.ई.५६४० ही हस्तगत केली आहे.
श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्री बापू बांगर, अप्पर पोलीस अधीक्षक सातारा, श्री. गणेश
किंद्रे, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई, भुईंज पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री रमेश गर्जे, सहाय्यक
पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली भुईंज पोलीस ठाणेकडील पोलीस उप निरीक्षक रत्नदीप भंडारे,
पोलीस अंमलदार बापुसाहेब धायगुडे, सागर माहिते, रविराज वर्णेकर, सोमनाथ बल्लाळ यांनी या कारवाईत
सहभाग घेतला आहे.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!