सिद्धनाथ हायस्कूलमध्ये फुले व फळे सजावट स्पर्धा उत्साहात
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड प्रतिनिधी :
सिद्धनाथ हायस्कूलमध्ये जीवशास्त्र विभागाच्या वतीने फुले व फळे सजावट स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या अनोख्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेला व विज्ञानातील सर्जनशीलतेला योग्य असा वाव दिला.

या स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी शाळा समितीचे निमंत्रित सदस्य श्री. संभाजी माने उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. विपुल दोशी यांनी हजेरी लावली. प्राचार्य श्री. दासरे सर, उपप्राचार्य श्री. यादव सर, सौ. कुलकर्णी मॅडम आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
स्पर्धेत एकूण ३० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विविध प्रकारच्या फुलांपासून व फळांपासून कलात्मक सजावट, आकर्षक मांडणी तसेच नवनवीन संकल्पना यांद्वारे विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली. प्रत्येकाच्या सादरीकरणात मेहनत, कल्पकता आणि विषयाबद्दलचे प्रेम दिसून येत होते.
यावेळी माण पंचायत समिती शिक्षण विभागाचे गट शिक्षणाधिकारी मा.श्री. लक्ष्मण पिसे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले व अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो असे सांगितले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जीवशास्त्र विभाग प्रमुख कु. साठे मॅडम, श्री. नलवडे सर, प्रयोगशाळा सहाय्यक श्री. बिराजदार सर, श्री. बाळू सरतापे सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
फुले व फळे सजावट स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलतेबरोबरच विज्ञानाविषयी आकर्षण निर्माण झाले असून, या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
–

