वडजल येथे इलेक्ट्रिकल दुकान फोडून एक लाख ६९ हजाराचा माल लंपास
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड : प्रतिनिधी
माण तालुक्यातील वडजल गावच्या हद्दीत कारंडेवाडी फाट्याजवळील विशाल इलेक्ट्रिकल मोटार रिवाईडींगच्या दुकानात दोन अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल ₹१,६९,६०० किंमतीचा माल चोरून नेला.
दि. 27 ऑगस्ट रोजी पहाटे १.१५ ते २.१५ या वेळेत ही घटना घडली. चोरट्यांनी दुकानातील लोखंडी गज कापून आत प्रवेश केला व मोनोब्लाँक व सबमर्शिबल मोटारी, कॉपर वायर, केबल, इंडस्ट्रियल मोटार यांसह विविध साहित्य लंपास केले.
या प्रकरणी महादेव जगन्नाथ पुकळे (रा. पुकळेवाडी, ता. माण) यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीवरून गुन्हा रजि. नं. 290/2025, भा. दं. संहितेनुसार दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपी हे अंदाजे ३० वर्षांचे दोन अनोळखी पुरुष असून त्यांनी चेहऱ्यावर हेड मास्क, हातात ग्लोज व पायात शुज घातलेले होते, असे फिर्यादीने सांगितले.
प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरूआहे

