जिह्वा परिषद शाळा म्हसवड नं. २ मध्ये ध्वजारोहण सोहळा अकील काझी यांचे हस्ते उत्साहात संपन्न
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड (ता. माण) :प्रतिनिधी
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून जिह्वा परिषद शाळा म्हसवड नं. २ येथे ध्वजारोहणाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात माजी नगरसेवक व म्हसवड नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते मा. अकील काझी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते अशोक काळे, दाऊद मुल्ला तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून वातावरण देशभक्तिमय केले.
कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. यावेळी मुख्याध्यापिकांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले व शाळेच्या प्रगतीविषयी माहिती दिली. पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच चारित्र्य व संस्काराचे महत्त्व पटवून दिले.
नगरसेवक अकील काझी यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना देशप्रेम, प्रामाणिकपणा आणि मेहनत या मूल्यांना जीवनात आत्मसात करण्याचे आवाहन केले. तसेच शाळेतील सोयीसुविधा वाढवण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षकांनी केले तर सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
–

