कराड शहर पोलिसांची कामगिरी : १२लाख.२० हजाराचे ५१ हरवलेले मोबाईल हस्तगत

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
कुलदीप मोहिते
कराड:प्रतिनिधी

कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतून गहाळ झालेले तब्बल 12 लाख 20 हजार रुपये किमतीचे 51 स्मार्ट मोबाईल फोन कराड शहर डी.बी. पथकाने हस्तगत करण्यात यश मिळवले.

ही मोहिम मा. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग श्रीमती राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, कराड शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशीलदार यांच्या सूचनेनुसार राबविण्यात आली.

डी.बी. पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी सीईआयआर पोर्टल आणि इतर तांत्रिक साधनांचा वापर करून महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई तसेच कर्नाटक, राजस्थान या राज्यांमध्ये जाऊन, मोबाईल धारकांशी वारंवार संपर्क साधून ही कारवाई केली.

या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर, पोलीस उपनिरीक्षक सतीश आंदेलवार, पोलीस हवालदार संदीप कुंभार, पो. ना. सज्जन जगताप, पो. ना. अनिल स्वामी, पो.कां. संग्राम पाटील, पो.कॉ. दिग्वीजय सांडगे, अमोल देशमुख, धीरज कोरडे, मोसीन मोमीन, आनंदा जाधव, मुकेश मोरे, म.पो.कॉ. सोनाली पिसाळ तसेच सातारा सायबर पोलीस ठाण्याचे पो.कॉ. महेश पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

नागरिकांना त्यांचे हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला असून, त्यांनी पोलिसांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे. ही मोहिम पुढील काळातही सातत्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक ताशीलदार यांनी दिली.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *