पिंपरी येथे गाडीच्या धडकेत म्हसवड च्या युवकाचा मृत्यू

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड प्रतिनिधी

म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 20 जुलै 2025 रोजी दुपारी 3:45 वाजण्याच्या सुमारास पिंपरी गावच्या हद्दीत दुर्दैवी रस्ता अपघात घडला असून, या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला आहे.

या प्रकरणी विशाल बाळु लोखंडे (वय 34, रा. दिवड, ता. माण, जि. सातारा) यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, आरोपी विजयानंद हणुमंत गुरव (वय 47, मुळ रा. निगडी-पवारांची देगाव, सध्या रा. आळंदी देवाची, ता. खेड, जि. पुणे) याने आपल्या ताब्यातील पांढऱ्या रंगाची महिंद्रा XUV 300 (क्र. MH14LE1144) भरधाव वेगात, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, राँग साईडने चालवली. यावेळी पिंपरी बस स्टॉपजवळून म्हसवडकडे येत असलेल्या महादेव मानसिंग भालेराव (वय 28, रा. म्हसवड) याच्या Splendor Plus (क्र. MH11CS7567) मोटारसायकलला जोराची धडक दिली.

या अपघातात महादेव भालेराव यांच्या डोक्याला, तोंडाला, हाताला आणि छातीला गंभीर मार लागला होता. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अपघातामुळे दोन्ही वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे.

Oplus_16908288

या प्रकरणी गुन्हा क्र. 245/2025 अन्वये BNS कलम 106(1), 281, 125(A), 125(B), 324(4) तसेच मोटार वाहन कायदा 184 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

गंभीर निष्काळजीपणामुळे एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वाहतूक नियम पाळणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *