गोंदवले बु. येथे गुरुपौर्णिमा उत्सवासाठी वाहतूक मार्गात बदल – पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची अधिसूचना

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज संपादक:अहमद मुल्ला
गोंदवले बु. (ता. माण) –प्रतिनिधी

येथील श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज मंदिरात दि. १० जुलै २०२५ रोजी गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या दिवशी महाराष्ट्रभरातून अंदाजे ७० ते ८० हजार भाविक गोंदवले येथे येण्याची शक्यता आहे. भाविकांची मोठी गर्दी, रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असलेली दुकाने आणि छोटी वाहने यामुळे वाहतूक व्यवस्थेवर ताण येऊ शकतो. यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत राखण्यासाठी वाहतूक मार्गात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३४ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दि. १०/०७/२०२५ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत पुढीलप्रमाणे वाहतूक मार्गात बदल करण्याचे आदेश दिले आहेत:

🔹 वाहतूक मार्गातील बदल पुढीलप्रमाणे:

1. सातारा बाजूकडून पंढरपूर / अकलूजकडे जाणारी वाहतूक
👉 खांडसरी चौक ते दहिवडी – राणंद – मार्डी – म्हसवड मार्गे वळविण्यात आली आहे.

2. पंढरपूर / अकलूजकडून सातारा बाजूकडे जाणारी वाहतूक
👉 म्हसवड – मायणी – खांडसरी चौक मार्गे किंवा
👉 म्हसवड – शिंगणापूर – फलटण मार्गे सातारा कडे वळविण्यात आली आहे.

3. पिंगळी बु. येथील खांडसरी चौक ते गोंदवले बु. येथील अप्पा महाराज चौक रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

या बदललेल्या मार्गांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, भाविक आणि वाहनचालकांनी बदलाची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

ही अधिसूचना दि. ८ जुलै २०२५ रोजी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या स्वाक्षरी व शिक्क्यानिशी जाहीर करण्यात आली आहे.

 

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *