शिवसेनेचा तर्फे वारकऱ्यांसाठी आषाढी वारीत माण तालुक्यात विविध ठिकाणी भोजन व सुविधा
व्हिजन २४ तास न्यूज संपादक :अहमद मुल्ला
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेल्या अनेक दिंडीतील वारकऱ्यांना माण तालुका शिवसेनेतर्फे पिंपरी, म्हसवड व धुळदेव या प्रमुख ठिकाणी भोजन व विविध प्राथमिक सुविधा पुरवण्यात आल्या. या उपक्रमामुळे हजारो वारकऱ्यांना माणदेशी मेहेर पाहायला मिळाली.

पिंपरी येथे वारकऱ्यांना खास माणदेशी पारंपरिक जेवण – झुणका, भाजरीची भाकरी, हिरव्या मिरचीचा ठेसा आणि कांदा – अशा अस्सल देशी पद्धतीचा स्वाद घेता आला. याचबरोबर म्हसवड व धुळदेव येथेही दिंडीतील वारकऱ्यांना जेवण आणि अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.

हा सेवा उपक्रम शिवसेना पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या आध्यात्मिक भावनेला पाठबळ देण्याच्या हेतूने माण तालुका शिवसेना प्रमुख बाळासाहेब मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला. पिंपरी येथील उपक्रमात बाळासाहेब मुलाणी यांच्यासमवेत युवासेना तालुका प्रमुख हणमंत राजगे, शहर प्रमुख अभिजित तरंगे, शाखा प्रमुख धनाजी राजगे, विभाग प्रमुख बापू तरंगे यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी सक्रिय सहभाग घेतला.
धुळदेव येथेही बाळासाहेब मुलाणी यांच्या पुढाकाराने भोजन व्यवस्था सुरळीत पार पडली. म्हसवड येथे झालेल्या कार्यक्रमात युवासेना तालुका प्रमुख हणमंत राजगे, शेतकरी सेना उपाध्यक्ष विश्वंभर बाबर, शिवसेना शहराध्यक्ष वैभव गुरव, पंत मंडले, अनिल मासाळ, आणि इतर पदाधिकारी व शिवसैनिकांनी योगदान दिले.
वारकऱ्यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करत शिवसेनेच्या या सेवाभावी उपक्रमाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद व आभार मानले.

