केंदूरमध्ये शालेय साहित्य, पॅड व पेन वाटप; मर्दानी खेळांचे मोफत प्रशिक्षणही जाहीर!

बातमी Share करा:

व्हिजन २४तास न्यूज (संपादक:अहमद मुल्ला)
गणेश तळेकर
मुंबई:प्रतिनिधी

पुणे (केंदूर ) :

सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, केंदूर येथे किसान स्पोर्ट करिअर अकॅडमी महाराष्ट्र राज्य, रमेशभाऊ येवले प्रतिष्ठान आणि विरंगणा मीडिया टीम यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक उपक्रम राबवण्यात आला.

या उपक्रमांतर्गत विद्यालयातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय दप्तरे वाटप करण्यात आली. तसेच इयत्ता ५ वी ते १२ वी मध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना परीक्षा पॅड देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. याचबरोबर आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पेन भेट देण्यात आले.

कार्यक्रमात किसान स्पोर्ट करिअर अकॅडमी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री. संजय तांबे यांनी विद्यालयात मोफत लाठी-काठी, घोडेस्वारी, दांडपट्टा, तलवारबाजी, ज्युडो-कराटे अशा पारंपरिक व मर्दानी खेळांचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती दिली. “या प्रशिक्षणामुळे विशेषतः विद्यार्थिनींना स्वतःचे रक्षण करण्याची ताकद मिळेल,” असेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला सिने अभिनेते भूषण घोलप, प्रशिक्षक मिलिंद ठोके, सागर भाऊ वर्पे, मोहन घोलप, अविंदादा मासळकर, अभी कामठे, ओंकार मासळकर, ज्ञानेश्वर मासळकर, मनोज खुळे, कपिल सर, कुमारी शितल वीर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य श्री. अनिल साकोरे यांनी केले. तर कार्यक्रमाची सांगता श्री. राम साकोरे (स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर – पुणे विभागीय सदस्य) यांनी आभारप्रदर्शन करत केली.

हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्याचे उत्तम उदाहरण बनला आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!