म्हसवड पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी फक्त दोन तासांत चोरी उघडकीस; शिक्षिकेचे सर्व सोन्याचे दागिने हस्तगत

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक:अहमद मुल्ला)
म्हसवड (प्रतिनिधी) –
जिल्हा परिषद शाळा पळशी येथे शाळा सुरू झालेल्या पहिल्याच दिवशी शिक्षिकेच्या पर्समधून सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या आरोपीस केवळ २ तासांत अटक करून १ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल शंभर टक्के हस्तगत करून म्हसवड पोलिसांनी अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

शाळेमध्ये मुलांचे ऍडमिशन घेण्याच्या बहाण्याने आलेल्या आरोपीने शिक्षिका प्रतीभा शरद कुल यांच्या पर्समधून सोन्याची साखळी, अंगठी व रिंगा असा मुद्देमाल चोरून नेला होता. याबाबत त्यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली तपासाला तात्काळ वेग देण्यात आला. शाळेतील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि त्यामध्ये एक अनोळखी इसम शिक्षिकांच्या स्टाफ रूममध्ये शिरून पर्समधील पॉकेटची चैन उघडून दागिने चोरताना स्पष्ट दिसून आला

तपासादरम्यान सदर व्यक्तीची ओळख पटवून आरोपी मनोज सुरेश घमंडे (वय ४०, रा. धामणी) याला शोधून शीताफिने पाठलाग करून अटक करण्यात आली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपीने पोलिसी खाक्यानंतर गुन्ह्याची कबुली दिली. त्याने चोरी केलेले सर्व दागिने धामणी गावातील मोकळ्या मैदानात खड्डा करून पुरल्याचे सांगितले. पोलिसांनी हे दागिने हस्तगत केले.

या संपूर्ण कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, देवानंद खाडे, राजेंद्र कुंभार, अमर नारनवर, नवनाथ शिरकुळे, सतीश जाधव यांनी परिश्रम घेतले.

ही यशस्वी कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार जोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या चपळ आणि अचूक कारवाईमुळे शाळा, पालकवर्ग व नागरिकांमध्ये म्हसवड पोलिसांचे विशेष कौतुक होत आहे. तक्रारदार शिक्षिकेचे सर्व दागिने परत मिळाल्याने त्यांनी पोलिसांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!