पंढरपूरच्या नामदेव महाराज स्मारकाला चालना देणाऱ्या जयकुमार गोरे भाऊंचा पोरे स्नेहमेळाव्यात गौरव
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड | प्रतिनिधी
म्हसवड येथे रविवार, ८ जून रोजी पार पडलेल्या समस्त पोरे परिवार स्नेहमेळाव्यात ग्रामविकास मंत्री मा. ना. जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. देशभरातून आलेल्या पोरे बांधवांच्या उपस्थितीत हा स्नेहमेळावा अत्यंत उत्साहात पार पडला.
यावेळी बोलताना जयकुमार गोरे भाऊ म्हणाले, “पंढरपूर येथील संत नामदेव महाराज यांचे स्मारक व पायऱ्यांचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल. नामदेव समाजाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचा सन्मान राखत शासन सकारात्मक भूमिका घेईल.”
या स्नेहमेळाव्याच्या आयोजनामागे इंजिनिअर सुनील पोरे यांची कल्पकता व नेतृत्व आहे. त्यांनी समाज एकत्र आणण्याचा उपक्रम हाती घेतला शिवाय इतर समाजासाठी करीत असलेल्या इंजि पोरे यांच्या कामाचे कौतुक मंत्री महोदयांनी केले त्यांना नामदेव समाजोन्नती परिषदेचे राज्य अध्यक्ष श्री. संजय नेवासकर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमात नामदेव समाजाचे मुख्य विश्वस्त राजेंद्र पोरे, केशवराज संस्थेचे अध्यक्ष बाळ आंबेकर, करणभैय्या पोरे, सौ. सुवर्णा पोरे, माजी नगराध्यक्ष नितीनभाई दोशी तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले पोरे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल काटकर यांनी केले. यावेळी मा. जयकुमार गोरे यांचा पोरे परिवाराच्या वतीने शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र देऊन इंजि. सुनील पोरे व संजय नेवासकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
हा स्नेहमेळावा केवळ कौटुंबिक नव्हे तर सामाजिक ऐक्य व एकतेचा आदर्श ठरला. या कार्यक्रमाने समाज संघटनाची नव्याने जाणीव करून दिली आहे.