राज्यमार्गावरील खड्ड्यांनी जीवघेणा प्रसंग; शिवसेनेकडून सार्वजनिक बांधकाम विभागास नोटीस

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते
शिवडे (ता. कराड उत्तर) :

राज्यमार्ग क्र. १४२, १२४ आणि १४३ या मार्गांवरील अतिवापरामुळे निर्माण झालेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे जिवित धोक्यात आले असून, रस्त्याची दुरवस्था लक्षात घेता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागास तातडीने दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

शिवसेना कराड उत्तर तालुकाप्रमुख मा.श्री. संजय (भैय्या) गुलाबराव भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग, उत्तर कराड यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, विद्यानगर ते मसूर, कोरेगाव फाटा ते खराडे फाटा, तारगाव रेल्वे गेट, रहिमतपूर, ओगलेवाडी, शामगाव खिंड, शिवडे फाटा, चाफळ फाटा ते चरेगाव या प्रमुख मार्गांवर पडलेले खड्डे अपघातास आमंत्रण देत आहेत.

भोसले यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, वेळोवेळी सूचना देऊनही बनवडी ते ओगलेवाडी रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असून, संबंधित ठेकेदारावर कारवाई करून त्वरित काम पूर्ण करण्यात यावे. अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडले जाईल आणि अपघात झाल्यास जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारावर राहील, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.

तसेच, शिवडे, वडोली भि. आणि इतर गावांसाठी दिशादर्शक फलक लावण्यात यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनावर जीवन गायकवाड (उप ता.प्रमुख, कराड उत्तर), गणेश दिपक जांभळे (शिवसैनिक), अमजद बाबालाल मुसांडे (ओगलेवाडी शहरप्रमुख) व विशाल शिवाजी कदम यांचीही सहस्वाक्षरी आहे.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!