संत नामदेव महाराज विश्व महासंमेलन 2026 : लोगोचे नितीन गडकरी यांच्या हस्ते अनावरण

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
नागपूर / म्हसवड प्रतिनिधी
संत परंपरेचे अध्वर्यू आणि समाज प्रबोधनाचे महान प्रतीक असलेल्या संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या जागतिक महासंमेलनाचे आयोजन जानेवारी 2026 मध्ये नागपूर येथे होणार आहे. या महासंमेलनाच्या लोगोचे अनावरण नुकतेच केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या भव्य कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. महाराष्ट्र राज्य नासपचे अध्यक्ष भास्कर टोपे, सातारा जिल्हाध्यक्ष संजय नेवासकर, इंजिनिअर सुनील पोरे, ईश्वर धिरडे, महेश मांढरे, अनंत जांगजोड, डॉ. अजय फुटाणे, राजुभाऊ किटे, प्रवीण शित्रे, प्रमोद कोरमकर, सुधर्मा खोडे, सुनील जावरकर, राजेश गंधे, दीपक नानोटकर, विलास मिरडे व सुनील किटे आदी मान्यवरांची उपस्थिती यावेळी होती.

कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी, “संत नामदेव महाराज यांचे कार्य जागतिक स्तरावर पोहोचावे यासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू,” असे स्पष्ट आश्वासन दिले.
पंढरपूर येथील श्री संत नामदेव महाराज स्मारक लवकरात लवकर उभारावे, यासाठी त्यांना लेखी निवेदनही सादर करण्यात आले. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी सातारा-पंढरपूर महामार्गावरील अपूर्ण पूल, मोऱ्या व पोहोच रस्त्यांच्या कामांचीही चर्चा झाली. हे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी नासपचे जिल्हाध्यक्ष इंजिनिअर सुनील पोरे यांनी केली.

संत नामदेव महाराज यांच्या कार्याची महती आणि त्यांचे विश्वव्यापी योगदान लक्षात घेता, हे महासंमेलन एक ऐतिहासिक पर्व ठरणार आहे, यात शंका नाही!

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!