राजकीय निष्ठेचं फळ : भरत पाटील यांची राज्यमंत्रीपदी नियुक्ती; कराडमध्ये जल्लोष

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते
कराड, प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते भरत पाटील यांची महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्रीपदी नियुक्ती होताच कराड तालुक्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाटणसारख्या दुर्गम भागात जन्मलेल्या आणि गेली तीन दशके पक्षासाठी झटणाऱ्या पाटील यांच्या निष्ठेला अखेर फळ मिळालं असून त्यांच्या या यशाने कराडकरांच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले.

“समय है सबका हिसाब करता है…” या ओळींसोबत कार्यकर्त्यांच्या भावना ओसंडून वाहत होत्या. भरत पाटील यांच्या आगमनावेळी कराडमध्ये झालेल्या स्वागत समारंभात हृदयस्पर्श दृश्य घडले. त्यांच्या सहकाऱ्यांनी ढसाढसा रडत त्यांचे स्वागत केले. एकीकडे ढोल-ताशांचा गजर, तर दुसरीकडे अश्रूंनी ओथंबलेली डोळ्यांची साक्ष, हे सर्व कराडकरांनी अनुभवले.

राजकारणातील सत्ताकेंद्राभोवती फिरणाऱ्या गणितांमध्येही निष्ठा ही दुर्मिळ ठरते. मात्र, भरत पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या भावनांना केंद्रस्थानी ठेवून पक्षनिष्ठा जपली. त्यामुळेच पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांची दखल घेत केंद्रीय खनिज विकास महामंडळावर संचालक म्हणून त्यांची नियुक्ती केली आणि आता थेट राज्यमंत्रीपदाची संधी दिली.

या प्रसंगी बोलताना भरत पाटील म्हणाले, “माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पक्षाने एवढं मोठं पद दिलं, हे माझं भाग्य आहे. ही संधी म्हणजे गेल्या तीस वर्षांच्या निष्ठेचा सन्मान आहे.”

कार्यकर्त्यांमध्येही भावना अनावर झाल्या. कविता कचरे म्हणाल्या, “भरत पाटील यांनी मला घडवलं, पक्षावर प्रामाणिक प्रेम कसं करावं हे शिकवलं. त्यांच्या यशामुळे मी भारावून गेले आहे.”

अनुप सूर्यवंशी, रामकृष्ण वेताळ, एकनाथ बागडी, धैर्यशील कदम, गणेश घोरपडे, सागर शिवदास, कविता कचरे, सीमा खोत यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. हलगीच्या तालात नाचत, फटाक्यांच्या गजरात आणि अश्रूंनी न्हालेल्या स्वागत सोहळ्यात भरत पाटील यांच्या राजकीय प्रवासाचा एक हृदयस्पर्श क्षण कराडकरांनी अनुभवला.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!