म्हसवडच्या श्री सिद्धनाथ मंदिरात ‘साल’ बदलण्याचा सोहळा उत्साहात संपन्न…

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड (दिलीपराज कीर्तने) :

येथील श्री सिद्धनाथ मंदिरात सालाबादप्रमाणे परंपरागत रूढी व रिवाजानुसार मंदिरातील पुजाऱ्यांचा ‘साल’ बदलण्याचा सोहळा उत्साहात संपन्न झाला,

महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आदी भागातील अनेकांचे कुलदैवत असलेल्या व दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या येथील श्री सिद्धनाथ जोगेश्वरी मंदिरातील गुरव (पुजारी) समाजाने वंश परंपरागत चालत आलेल्या प्रथेची तंतोतंत व अव्याहत, अखंडपणे जोपासना केल्याने या मंदिराचे पावित्र्य आजही अबाधित राहिले आहे.

या मंदिरातील श्रींची दैनंदिन स्नान, पूजा, आरती आदि धार्मिक विधी वंश-परंपरा राखून शुचिर्भूतपणे करण्यासाठी वर्षभर एक गुरव (पुजारी) नेमलेले असतात. त्यांना ‘सालकरी’ म्हणतात. सालाबादप्रमाणे व पूर्व परंपरेनुसार दरवर्षी वैशाखी पौर्णिमेला हे ‘साल’ बदलत असते हे ‘सालकरी’ या मंदिराचे मुख्य पुजारी असतात.

श्री सिद्धनाथांची सेवा-भक्ती-उपासना करण्यासाठी व देवी-देवतांचे पावित्र्य राखण्यासाठी वंश-परंपरेनुसार रोटेशन पद्धतीने हे साल दरवर्षी वैशाखी पौर्णिमेला बदलत असते. हे ‘साल’ म्हणजे एक वर्षाचे अतिशय कडक असे व्रत आहे. हे साल करणारांना अतिशय कडक अशा नियमांचे वर्षभर पालन करावे लागते. मंदिराचे पावित्र्य

राखण्यासाठी करण्यात आलेल्या या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून वेळप्रसंगी हे साल काढून घेण्याचीही व्यवस्था येथील गुरव समाजाकडून केली जाते.

अविवाहित युवकास हे साल दिले जात नाही. साल करण्यासाठी विवाहित असणे आवश्यक असते. मात्र साल सुरू केल्यानंतर वर्षभर पूर्ण ब्रह्मचर्य पाळावे लागते. वर्षभर गावाची वेस न ओलांडता गावातच मंदिरात वास्तव्य करून श्रींची सेवा करावयाची असते. सालकरी यांनी वर्षभर सकाळ-संध्याकाळ स्नान करून शुचिर्भूत होऊन श्रींची पूजा, आरती करावयाची असते. वर्षभर पायात चप्पल न घालता लाकडी खडावा वापरावयाच्या असतात. धोतर, बाराबंदी, पांढरा रुमाल (फेटा) असा पेहराव गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि खांद्यावर उपरणे घ्यावे लागते. बायको, मुले, घर, संसार, प्रपंच न पाहता वर्षभर केवळ श्रींची भक्ती, सेवा, उपासना करावयाची असते. वर्षभर व्रतस्थ राहून श्रींची सेवा / उपासना करावयाची असल्याने त्यांना ‘देव अवतार’ मानले जाते. तेच देवस्थानचे मुख्य पुजारी असतात.

गतवर्षी महेश जालिंदर गुरव यांचे साल होते आता रामचंद्र महादेव गुरव यांचेकडे साल देण्याचा सोहळा वैशाखी पौर्णिमेला कराडचे डुबल मानकरी, सेवेकरी व हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
======================.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *