इंजि.सुनिल पोरे यांनी घेतलेल्या रक्तदान शिबीरास युवकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद : सर्व समाजातील १६१ रक्तदात्यांनी केले रक्तदान
म्हसवड ; प्रतिनिधी

नामदेव समाजोन्नती परिषद व जनश्री फाऊंडेशन म्हसवड यांचे संयुक्त विद्यमानाने व मे.शुभम भारतगॅस एजन्सी यांच्या सहकार्यातून आयोजित भव्य रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असुन गावातील सर्व समाजातून तब्बल १६१ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.या शिबीराचे उद्घाटन म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भूजबळ, माजी नगराध्यक्ष नितीन दोशी, अकिल काझी सुरेश म्हेत्रे, शंकर विरकर, मा उपनगराध्यक्ष दत्ता रोकडे, धनाजी माने, आप्पासाहेब पुकळे, काकासाहेब माने, बी एम अब्दागीरे अण्णा टाकणे, अनिल व्होरा, यांचे उपस्थितीत करण्यात आले
या प्रसंगी बोलताना नितीन शेठ दोशी म्हणाले, माण तालुक्यामध्ये इंजिनिअर सुनील पोरे यांनी विविध समाज उपयोगी उपक्रम राबवून आपला नावलौकिक वाढवलेला आहे सर्वच क्षेत्रांमध्ये इंजिनीयर सुनील पोरे यांचे काम अतिशय महत्त्वपूर्ण आहे यामध्ये त्यांच्या कुटुंबाचे मोठे योगदान आहे.नासप जिल्हाअध्यक्ष या नात्याने इंजि.सुनील पोरे यांच्या कारकीर्दीच्या शुभारंभी आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरास कमालीचा प्रतिसाद मिळाला असून खाजगी संस्थेने/समाजाने म्हसवड मध्ये केलेले सर्वउंच्चाक मोडीत काढत नवा विक्रम नोंदवला असल्याचेही दोशी म्हणाले
यावेळी आपले मनेगत व्यक्त करतांना एपीआय भुजबळ म्हणाले, सामाजिक काम करण्यासाठी सर्वांची साथ मोलाची असते आणि यामुळेच अधिकाधिक लोकोपयोगी उपक्रम राबवले जातात या उपक्रमांमध्ये शिंपी समाजाने आयोजित केलेले रक्तदान शिबिर अतिशय महत्वाचे असून दिवसेंदिवस रक्ताची गरज अधिक भासत आहे यासाठी रक्तदान शिबिर हे गावोगावी होणे अधिक महत्त्वपूर्ण आहे. पोरे कुटुंबातील सदस्यांचे सर्व समाजातील लोकांशी अगदी जिव्हाळ्याचे संबंध असल्यानेच नवा विक्रम नोंदवू शकले असल्याचे भुजबळ यांनी सांगीतले
या शिबीराच्या आदल्या दिवशीच म्हसवड येथील पोलीस स्टेशन ने रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते या शिबीरात ३२५ रक्तदात्यांनी रक्तदान केले होते त्यामुळे लगेच दुसऱ्याच दिवशी रक्तदान शिबीर यशस्वी होईल असे वाटत नव्हते तरी आज सातारा नासप जिल्हाअध्यक्ष इंजि.सुनील पोरे यांनी म्हसवडकर नागरीकांच्या ह्रदयात मिळवलेले स्थान ते करत असलेले सामाजिक कार्य
यामुळे त्यांचा वाढत चाललेला जनसंपर्क त्याचा परीणाम आज दिसून आला तब्बल १६१ रक्तदात्यानी रक्तदान केले यात युवकांचा मोठा सहभाग होता पोरे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत म्हसवड शहरवासीयांसाठी मदतीचा हात देत आहेत कोरोना काळात त्यांनी केलेले काम ,दुष्काळी माण तालुक्याला पुराचे वाहुन जानारे पाणी मिळावे यासाठी केलेले उपोषण,रुग्णवाहिका लोकार्पण, फोरलेन हायवे साठी पुकारलेले आंदोलन अशा एक न अनेक सामाजिक कार्यात सतत वाहुन घेतलेल्या म्हसवड शहराच्या विकासाचे ध्येय घेऊन चाललेल्या पोरे साहेबांची सर्व जाती धर्माचे लोकात एक वेगळीच क्रेज निर्माण झाली आहे आणी यामुळेच आज साहेबांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात मोठ्या उत्साहाने सर्व जाती धर्मातील लोकांनी युवकांनी उपस्थिती दाखवून दिली असल्याचे पत्रकार आण्णा टाकणे यांनी सांगीतले
कार्यक्रम यशस्वी करणेसाठी करणभैय्या पोरे, अॅड शुभम पोरे,देविदास पोरे, सौ सुवर्णाताई पोरे नगरसेवक संजय सोनवणे, आकाश मेंढापुरे, विशाल गोंजारी, अतुल फुटाणे, प्रकाश डोंगरे, भिकु पोरे,गणेश नामदास, आकाश पिसे, अविनाश चव्हाण,बालाजी ब्लड सेंटर चे डाॅ.महेश गायकवाड, पांडूरंग सरक व सर्व समाज बांधवांनी परिश्रम घेतले