म्हसवडचे बंडोपंत लोखंडे यांची ऑल महाराष्ट्र सिलंबम असोसिएशनच्या राज्य संघटकपदी निवड सातारा जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक : अहमद मुल्ला )
म्हसवड प्रतिनिधी

म्हसवडचे युवा नेतृत्व बंडोपंत लोखंडे यांनी आणखी एक मोठी कामगिरी करत ऑल महाराष्ट्र सिलंबम असोसिएशनच्या राज्य संघटकपदाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. महाबळेश्वर तालुक्यातील भिलार येथील एलिझम रिसॉर्टमध्ये दि. २३ एप्रिल रोजी पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेत त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली.

या निवडणुकीत अध्यक्ष श्री. पी. वाय. आत्तार यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण राज्य कार्यकारिणीची निवड करण्यात आली.यावेळी महिला आघाडीच्या पदांवर डॉ. अमरप्रीत शेख (अहिल्यानगर), अंजुप्रभु वासनिक (चंद्रपूर) व हेमलता खोब्रागडे (चंद्रपूर) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच, अध्यक्ष म्हणून श्री. पी. वाय. आत्तार (पिंपरी चिंचवड), कार्याध्यक्ष श्री. दुषांत नगराळे (चंद्रपूर), सरचिटणीस डॉ. जिया शेख (अहिल्यानगर), सहसचिव श्री. वाल्मिकी खोब्रागडे (चंद्रपूर), उपाध्यक्ष श्री. आकाश साळवे (सोलापूर) व श्री. अमीन शेख (नागपूर), संघटक श्री. बंडोपंत लोखंडे (सातारा) यांची निवड करण्यात आली.
त्याचप्रमाणे निरीक्षण समितीत करण नेवारे (चंद्रपूर) आणि स्पर्धा नियोजन समितीत श्री. गणेश मांढरे (पिंपरी चिंचवड) यांचा समावेश करण्यात आला आहे.
लोखंडे यांच्या निवडीने सातारा जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बंडोपंत लोखंडे यांनी सिलंबम या प्राचीन मर्दानी कलेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी गेली अनेक वर्षे झपाटून काम केले आहे. विविध शिबिरे, स्पर्धा आणि प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून त्यांनी युवकांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती आणि आत्मसंरक्षणाचे महत्त्व रुजवले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या इतर भागांतही सिलंबम कलेचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे.

राज्य संघटकपदाच्या माध्यमातून बंडोपंत लोखंडे संपूर्ण महाराष्ट्रभर सिलंबम कलेचा विकास घडवून आणण्याचा संकल्प बाळगत आहेत. जिल्हास्तरावर प्रशिक्षण शिबिरे, स्पर्धांचे आयोजन, महिलांसाठी विशेष आत्मसंरक्षण कार्यशाळा आणि ग्रामीण भागात या कलेबद्दल जागृती करण्यावर त्यांचा भर राहणार आहे.

लोखंडे यांच्या या निवडीचे सातारा जिल्ह्यात सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. जिल्ह्यातील माजी पदाधिकारी, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, प्रशिक्षकवर्ग आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. साताऱ्यातील विविध संघटना व संस्थांनी त्यांच्या निवडीचा गौरव करत त्यांच्या कार्याला पाठिंबा जाहीर केला आहे.

या निवडीबद्दल बोलताना बंडोपंत लोखंडे म्हणाले, “ही केवळ माझी नाही तर संपूर्ण सातारा जिल्ह्याची आणि महाराष्ट्रातील प्रत्येक सिलंबमप्रेमीची निवड आहे. आपल्या कलेचा गौरव वाढवण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करेन. युवकांमध्ये शिस्त, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित करणे हाच माझा प्रमुख उद्देश राहील.”

 

 

 

 

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!