म्हसळा दिघी नाक्यावर पाकिस्तानचा निषेध; शिवसेना युवासेनेच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
विशाल सायकर
म्हसळा( रायगड ) प्रतिनिधी
जम्मू-काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ पहलगाम येथे महाराष्ट्र तसेच इतर राज्यांतील हिंदू आणि मुस्लिम पर्यटकांवर पाकिस्तानी दहशतवादी संघटनांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा बळी गेला असून, देशभरातून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त होत आहे.
या दहशतवादी हल्ल्याचा निषेध म्हणून म्हसळा तालुक्यातील दिघी नाक्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) व युवासेनेच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात दहशतवादाचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्यात आला आणि ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘दहशतवादाचा नाश व्हावा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.


