महात्मा जोतिबा फुले यांची जयंती मोफत नगर वाचनालयात उत्साहात साजरी

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड (ता. माण) :

सामाजिक समतेचे प्रणेते, स्त्री शिक्षणासाठी आयुष्य वेचणारे थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांची जयंती म्हसवड येथील मोफत नगर वाचनालयात मोठ्या उत्साहात आणि गौरवपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाचे उद्घाटन कै. अतुल पिसे सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मा. गणेश पिसे यांच्या शुभहस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोफत नगर वाचनालयाचे अध्यक्ष नितिनभाई दोशी होते. त्यांनी मा. गणेश पिसे यांचा श्रीफळ देऊन सत्कार केला व त्यांचे समाजकार्यातील योगदान अधोरेखित केले.

यावेळी शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष सुभाष शेटे, बाबू मुल्ला, विलास माने, देविदास डमकले, निवृत्ती सराटे, निलेश लिंगे, दिनेश मोरे, ग्रंथपाल सुनिल राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला. त्यांच्या समाजसुधारणेच्या कार्याचा गौरव करताना अनेक वक्त्यांनी आजच्या काळातील त्यांचे विचार किती समर्पक आहेत हे अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ग्रंथपाल सुनिल राऊत यांनी केले,


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!