भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा – म्हसवडमध्ये जिलेबी वाटप व झेंडा वंदन
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड (प्रतिनिधी) –
भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त म्हसवड येथे उत्साहपूर्ण वातावरणात विविध उपक्रमांद्वारे स्थापना दिन साजरा करण्यात आला. ग्रामविकास व पंचायत राज मंत्री मा. ना. जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या सूचनेनुसार हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे आयोजन माजी नगराध्यक्ष नितिन भाई दोशी यांनी केले होते. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत भाजपाचा झेंडा उभारून व नागरिकांना जिलेबी वाटप करून पक्षाचा स्थापना दिन मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा केला.

या वेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांमध्ये माजी नगराध्यक्ष नितिन दोशी, संजय भागवत, सागर नामदे, चरण माने, माजी नगरसेवक कोळेकर, अभय लोखंडे, विशाल लोखंडे, भैय्या ओतारी, अक्षय धट, आनंदा लिंगे, शेखर भोसले, आकाश वणारी, जितू भाई दोशी, खाजू मुल्ला, बाबू मुल्ला, रेवांश भैय्या आणि रेवा दीदी यांचा समावेश होता.
कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांनी पक्षाच्या विचारधारेचा प्रचार व प्रसार करण्याची प्रतिज्ञा घेतली. तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनतेमध्ये पक्षाचे कार्य पोहोचवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाचे संयोजन उत्कृष्ट रितीने पार पडले असून, नागरिक व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे स्थापना दिनाचा उत्सव अधिकच उत्साहवर्धक ठरला.

