पक्षध्वज पायी संकल्प यात्रा— महाराष्ट्र सैनिक प्रमोद आरणे यांचा उत्साहपूर्ण प्रवास कोल्हापूर ते मुंबई पर्यंतचा पायी प्रवास
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते
कराड
कोपरगाव (शिर्डी), जि. अहिल्यानगर येथील महाराष्ट्र सैनिक प्रमोद ताईबाई प्रकाश आरणे यांनी पक्षध्वज पायी संकल्प यात्रा सुरू केली आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरापासून दादर, छत्रपती शिवाजी पार्क, मुंबई (शिवतीर्थ) येथे पोहोचण्याचा त्यांचा संकल्प आहे.
या यात्रेच्या माध्यमातून त्यांनी महालक्ष्मी देवीला साकडे घातले असून, आगामी महानगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाला भव्य यश मिळावे, तसेच पक्षप्रमुखांना दीर्घायुष्य लाभावे व कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळावी, अशी प्रार्थना केली आहे.
प्रवासादरम्यान उंब्रज नगरीत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी अमोल सुभाष कांबळे (सातारा जिल्हा सचिव), रणजीत कदम (तालुका अध्यक्ष), विजय वाणी (शहर अध्यक्ष), बापू कदम (उप शहर अध्यक्ष), रमेश पाटील आणि सुनील जाधव उपस्थित होते.त्यांनी शिवरायांच्या प्रेरणेने महाराष्ट्र सैनिकांचे हे कार्य अधिक बळकट होवो, अशा शुभेच्छा दिल्या