म्हसवड पोलीस स्टेशनचे एपीआय अक्षय सोनवणे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला)
म्हसवड :
म्हसवड पोलीस स्टेशनचे नूतन एपीआय अक्षय सोनवणे यांचा स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यांनी नुकतीच म्हसवड पोलीस स्टेशनमध्ये पदभार स्वीकारला असून, त्यापूर्वी दहिवडी पोलीस स्टेशन येथे त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
पोलीस दलातील त्यांच्या तातडीच्या आणि प्रभावी कामगिरीचे उदाहरण म्हणजे, स्टार ट्रॅव्हल्सचे मालक श्री दिलीप विरकर यांची चोरीस गेलेली गाडी अवघ्या २४ तासांत शोधून काढण्याची कामगिरी. या तपासात अक्षय सोनवणे साहेब, वाघमोडे साहेब आणि त्यांच्या टीमने महत्त्वाची भूमिका बजावली. या यशस्वी शोधमोहिमेबद्दल म्हसवड ग्रामस्थांनी त्यांचा विशेष सत्कार केला.
या कार्यक्रमाला स्टार ट्रॅव्हल्सचे मालक दिलीपशेठ विरकर, १०वी बोर्ड म्हसवडचे केंद्रसंचालक दिलीप माने, वेल्डन पार्सलचे राकेश सराटे, तसेच विशाल माने, बबन विरकर, अजित बनसोडे, सतीश जाधव आणि निलेश सरतापे उपस्थित होते.
या वेळी केंद्रसंचालक दिलीप माने यांनी म्हसवड पोलिसांचे आभार मानले. त्यांच्यामुळे इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षा शांततेत पार पडल्या. तसेच, नव्याने पदभार स्वीकारलेल्या एपीआय अक्षय सोनवणे यांना पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.