निळेश्वर माध्यमिक विद्यालयामध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा.

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक : अहमद मुल्ला )

कुलदीप मोहिते कराड

ज्ञान प्रसारक शिक्षण संस्था संचलित निळेश्वर माध्यमिक विद्यालयामध्ये वडोली (नि.) शाळेचे मुख्याध्यापक व महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष मा. श्री. नलवडे सर यांच्या मार्गदर्शनाने व माता-पालक समितीच्या सचिव सौ. हिरवाळे मॅडम यांच्या नियोजनाने 8 मार्च हा महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

विद्यालयातील विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या क्षेत्रातील यशस्वी महिला (डॉ. आनंदीबाई जोशी, सावित्रीबाई फुले, कल्पना चावला…) त्यांची वेशभूषा केलेली होती. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. हसीना मुजावर मॅडम, मा. नितीन कुचेकर सर , महिला पालक व वेशभूषा केलेल्या विद्यार्थिनी यांचे ढोल ताशांच्या गजरात विद्यालयामध्ये स्वागत केले. तसेच इ.9 वी मधील (R.S.P.) विद्यार्थ्यांनी संचलन करून प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. प्रमुख पाहुण्यांचे व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर इ.9 वी च्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत व इशस्तवन सादर केले. त्यावेळी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी प्रतिमा पूजन केले. यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री. नलवडे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली.या यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. नितीन कुचेकर (बीट अधिकारी, पोलीस हवलदार निर्भया पथक कराड तालुका पोलीस स्टेशन) व मा. एच.एच. मुजावर मॅडम (पोलीस हवालदार निर्भया पथक कराड तालुका पोलीस स्टेशन) यांनी प्रसार माध्यमांचा वापर, त्याचे दुष्परिणाम तसेच महिलांवरील अत्याचार यावर उपस्थित महिला पालक व विद्यार्थी यांना सखोल मार्गदर्शन केले तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. नलवडे सर यांनी उपस्थित सर्व महिलांना व विद्यार्थ्यांना मोबाईलचा गैरवापर टाळावा या करिता आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन- प्राजक्ता पवार, मनोगत- सिद्धी पवार ,आभार- सानिका पवार या 9 वी च्या विद्यार्थिनींनी केले. या कार्यक्रमाची सांगता उपस्थित महिला पालकांना भेटवस्तू देऊन झाली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
** विद्यार्थ्यांनी सामाजिक भान ठेवावे सोशल मीडियाचा योग्य वापर करावा निर्भया पथक कराड तालुका पोलीस स्टेशन ठाणे अमलदार एच मुजावर


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!