शिवजयंतीच्या दिवशी मोफत आरोग्य शिबिराचा स्तुत्य उपक्रम

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
गणेश मिंड, विशेष प्रतिनिधी
इंदापूर

मदनवाडी (ता. इंदापूर) येथे दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी गिरीराज हॉस्पिटल, बारामती आणि पद्मा क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. हर्षवर्धन ढवळे मित्रपरिवाराच्या पुढाकाराने झालेल्या या शिबिराचे उद्घाटन भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष सौ. अनुष्का अनिकेत भरणे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सौ. अनुष्का भरणे म्हणाल्या, “महापुरुषांचे विचार केवळ वाचून थांबणे नाही, तर ते प्रत्यक्ष कृतीत आणणे महत्त्वाचे आहे. अशा सामाजिक उपक्रमांमधून समाजाचे आरोग्य सुरक्षित राहील, आणि हा उपक्रम खरंच प्रेरणादायी आहे.”

या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते प्रकाश बापू ढवळे, हनुमंत बंडगर, तुकाराम बंडगर, नानासाहेब बंडगर, आबासाहेब देवकाते, अण्णासो धवडे, हेमाताई माडगे, ॲड. पांडुरंग जगताप, सचिन बोगावत, प्रदीप वाकसे, धनंजय थोरात, दादासाहेब थोरात, रणजीत निकम, नारायण बंडगर, सतिश बंडगर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

शिबिरात 200 हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल यांसारख्या तपासण्यांसह विविध वैद्यकीय सल्ला आणि मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. तसेच, संसर्गजन्य आजारांबाबत आवश्यक मार्गदर्शनही करण्यात आले.

या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी आणि स्थानिक रहिवाश्यांनी कौतुक केले. भविष्यातही अशा आरोग्य शिबिरांचे आयोजन करून ग्रामीण भागातील अधिकाधिक नागरिकांना या सेवेचा लाभ मिळावा, असा संकल्प आयोजकांनी केला आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णुपंत देवकाते यांनी केले, तर प्रमोदकुमार कुदळे गुरुजी यांनी आभार मानले. संजय बंडगर, विशाल धुमाळ, अरविंद देवकाते, दिनेश भोईटे, गोपाळ ढवळे, राहुल ढवळे, अजित शिंदे, हेमंत निकम, गौरव ढवळे, अविनाश ढवळे आदींनी नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावली.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!