दौशाडकार डॉ. नंदकुमार राऊत यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान मोलाचे, -डॉ. उदय निरगुडकर

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला)
म्हसवड:प्रतिनिधी 
माणदेशाचे सुपुत्र डॉक्टर नंदकुमार राऊत आवर सचिव वित्त व नियोजन विभाग मंत्रालय, मुंबई यांनी लिहिलेल्या व अल्पावधीत मराठी माणसाच्या मनावरती अधिराज्य गाजवणाऱ्या दौषाड या कादंबरीसाठी अखिल भारतीय पातळीवरती मानाचा समजला जाणारा मराठी वांग्मय परिषद, बडोदे गुजरात यांचा उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार प्रसिद्ध निवेदक व लेखक डॉक्टर उदय निरगुडकर यांच्या हस्ते दिनांक 9 फेब्रुवारी रोजी बडोदे या ठिकाणी देण्यात आला
ग्रामीण भागातील शेतकरी कष्टकरी कुटुंबातील पुरुषप्रधान संस्कृतीतील तरुण मुलांचा आणि मुलींचा त्याच्या जडणघडणे मध्ये परिस्थितीशी होणारा संघर्ष डॉक्टर राऊत यांनी आपल्या या कादंबरीमध्ये हुबेहूब मांडला आहे. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये डॉक्टर राऊत यांनी आपल्या पत्नीला प्रोत्साहन देऊन एक गृहिणी ते पोलीस अधीक्षक हा त्यांचा प्रवास आपल्या कादंबरीमध्ये खूप चांगल्या प्रकारे शब्दबद्ध केला आहे .स्त्री वादाला पोषक असे काम करणाऱ्या डॉक्टर राऊत यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान अतिशय मोलाचे आहे आणि त्यांच्याकडून अशाच चांगल्या चांगल्या साहित्यकृती निर्माण होवोत अशी अपेक्षा यावेळी बोलताना डॉक्टर उदय निरगुडकर यांनी व्यक्त केली आणि त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!