एकल नाट्यमहोत्सवाचे उद्घाटन आमदार महेश सावंत यांच्या हस्ते संपन्न

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

गणेश तळेकर
मुंबई प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सहयोगाने आयोजित स्वामीराज प्रकाशनच्या एकल नाट्यमहोत्सवाचे उद्घाटन आमदार महेश सावंत यांच्या हस्ते थाटात संपन्न झाले. या कार्यक्रमाला नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे, कवी व प्राध्यापक अशोक बागवे, दिग्दर्शक मंगेश सातपुते, महोत्सवाचे सूत्रधार सुधीर चित्ते आणि स्वामीराज प्रकाशनाचे रजनीश राणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात प्रा. अशोक बागवे यांच्या ‘नाटयस्वधर्म’ आणि अजितेम जोशी यांच्या ‘स्मरण रंग’ या दोन महत्त्वपूर्ण पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार महेश सावंत यांनी मराठी नाटकांच्या परंपरेचा गौरव करत, या एकल नाट्यमहोत्सवामुळे नाट्यकलेला नवा आयाम मिळेल, असे मत व्यक्त केले. प्रा. अशोक बागवे यांनी मराठी नाटकाच्या स्वभावधर्मावर प्रकाश टाकताना लेखक, दिग्दर्शक, आणि प्रेक्षक यांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे, हे अधोरेखित केले.

हा नाट्यमहोत्सव विविध प्रयोग आणि कलाविष्कारांनी नटलेला असून, प्रेक्षकांसाठी एक विशेष पर्वणी ठरणार आहे.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!