अनधिकृत सुरू असलेल्या ख्रिश्चन प्रार्थना स्थळाचे बांधकाम तातडीने थांबवावे.

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
चाफळ: प्रतिनिधी श्रीकांत जाधव

दाढोली ग्रामपंचायतीला हिंदू एकता आंदोलनाचे निवेदन.

गेल्या काही दिवसांपासून चाफळ विभागातील दाढोली येथील ग्रामपंचायतीच्या हद्दीत अनधिकृत रित्या ख्रिश्चन प्रार्थना स्थळाचे बांधकाम जोमाने सुरू आहे. आणि विशेष बाब म्हणजे ग्रामपंचायतीकडून कोणतीही परवानगी न घेता याचे काम सुरू आहे. तसेच गेल्या वर्षभरात ख्रिश्चन धर्मगुरूंकडून हिंदू धर्म परिवर्तनाचा घाट देखील घातला गेलेलाआहे. त्यामुळे भविष्यात जातीय तेढ निर्माण निर्माण झाल्यास होणाऱ्या परिणामास ख्रिश्चन धर्मगुरू आणि त्यांचे प्रसारक हे जबाबदार असतील.

    त्यामुळे प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा हिंदू एकता आंदोलन त्यांचा योग्य तो बंदोबस्त करेल. अशा स्वरूपाचे निवेदन नुकतेच हिंदू एकता आंदोलनाचे अध्यक्ष मा.ना.श्री. विक्रम पावसकर यांनी संबंधित गावास भेट देऊन आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत ग्रामसेवक प्रकाश रावते यांना या संदर्भात निवेदन देण्यात दिले. याप्रसंगी सदस्य अजय डांगे, लालासो डांगे, संभाजी डांगे, अंकुश डांगे, पोलीस पाटील संजय पवार गावातील युवक आणि ग्रामस्थ तसेच हिंदू एकता आंदोलनाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!