ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात…

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड प्रतिनिधी –

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती मोठ्या उत्साहाने जि. प. शाळा गोसावीवाडी ता. माण येथे साजरी करणेत आली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंती निमित्त जिल्हा परिषद गोसावीवाडी प्राथमिक शाळेत बालसभा आयोजित करणेत आली होती. बालसभेचे अध्यक्ष इ. दूसरीतील विद्यार्थीनी कु. अनन्या बिराजदार हिने भूषविले.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विविध प्रकारच्या वेशभूषा विद्याथ्यांनी केलेल्या होत्या. इ. दूसरीतील छोटासा संस्कार मंगरुळे याने जोतिबाची वेशभूषेत तर सावित्रीमाईंच्या वेशात सृष्टी कलढोणे होते. सर्वच विद्यार्थी विविध प्रकारच्या वेश‌भूषेत येऊन त्यांच्या जीवनावर आधारीन भाषणे, ओव्या सादर केल्या.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!