दहिवडी पोलीस ठाण्याची उल्लेखनीय कामगिरी: नागरिकांना नुतन वर्षाची अनोखी भेट – १९ लाखांच्या ७८ मोबाईलची परतफेड

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

दहिवडी (ता. ३ जानेवारी २०२५) –

दहिवडी पोलीस ठाण्याने नववर्षाच्या निमित्ताने नागरिकांना अनोखी भेट दिली आहे. चोरीस गेलेले आणि हरवलेले एकूण ७८ मोबाईल, ज्यांची एकूण किंमत १९ लाख रुपये आहे, शोधून त्यांचे मूळ तक्रारदारांना परत करण्यात आले.

ही कामगिरी श्री अक्षय सोनवणे, सहायक पोलीस निरीक्षक, प्रभारी अधिकारी दहिवडी पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने केली आहे.

मा. पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी हरविलेले मोबाईल शोधण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्याचे निर्देश दिले होते.

दहिवडी शहरात हे तालुक्याचे ठिकाण असुन तालुक्यातील मुख्य बाजरपेठ असल्याने तसेच आसपासचे गावातुन शासकीय कार्यालयात, विद्यलये तसेच महाविद्यलये, तसेच शिखर शिंगणापुर व गोंदवले (बु.) ही राज्यातील धर्मीक ठिकाणे असुन दहिवडी शहरातुन सातारा ते पंढरपुर व बारामती ते सांगली जाणारे मुख्य मार्गावरील बस स्थानक असल्याने दहिवडी येथे आजुबाजुच्या गावातुन हजारोचे संख्येने लोक नोकरी, रोजगार, शिक्षण, बाजारपेठेमध्ये खरेदी व इतर करण्यासाठी दहिवडी शहरात येत जात असतात त्यावेळी प्रवासात, बाजार पेठेत व इतर ठिकाणी नागरीकांचे मोबाईल फोन हे गहाळ होत आहेत. सदर गहाळ झाले मोबाईल फोनचे तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तसेच सी.ई. आय. आर. पोर्टलचे मदतीने दहिवडी पोलीस ठाणे येथे श्री अक्षय सोनवणे यांनी नेमलेले विशेष पथकाने महाराष्ट्र राज्याचे विविध भागामधुन तसेच इतर राज्यातुन मोबाईल परत मिळवत गहाळ झालेले मोबाईल तक्रारदार यांना परत केल्याने नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाबाबत प्रशंसनीय भावना व्यक्त करण्यात येत आहे.

मागील वर्षभरात (एप्रिल २०२४ पासून), विशेष पथकाने एकूण १०२ मोबाईल, ज्यांची किंमत २६ लाख रुपये होती, तक्रारदारांना परत केले आहेत.

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक साो श्री. समिर शेख, मा. अप्पर पोलीस अधिक्षक साो, श्रीमती वैशाली कडुकर मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो श्रीमती अश्विनी शेंडगे यांचे मार्गदर्शनाखाली श्री अक्षय सोनवणे सहायक पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी दहिवडी पोलीस ठाणे, पोलीस उप निरीक्षक यशवंत जामदार, पो. हवा. बापु खांडेकर, श्रीनिवास सानप, पो.ना. नितीन धुमाळ, पो.कॉ. निलेश कुदळे, महेंद्र खाडे, असिफ नदाफ पो.कॉ. महेश पवार (सायबर) यांच्या पथकाने केली आहे. मा. पोलीस अधिक्षक साो श्री समीर शेख व मा. अप्पर पोलीस अधिक्षक सोो, श्रीमती वैशाली कडुकर यांनी दहिवडी पोलीस ठाणेचे विशेष पथकाचे अभिनंदन केले आहे.

 

 

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!