इंजिनिअर सुनील पोरे यांचा अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघाच्या विशेष सभेत सन्मान

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
अमरावती
आज, दि. २९ डिसेंबर २०२४ रोजी अमरावती येथे अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ, नवी दिल्ली यांच्या विशेष सभेत ना.स.प. सातारा जिल्हा अध्यक्ष इंजिनिअर सुनील पोरे यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी महासंघाचे अध्यक्ष नानासाहेब पाथकर यांच्या प्रमुख उपस्थितीत देशभरातील अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात नामदेव समाजोन्नती परिषदेचे प्रमुख पदाधिकारी बाळासाहेब आंबेकर, डॉ. अजय फुटाणे, रवी रहाणे, महेश मांढरे, प्रवीण शिंत्रे, एकनाथ सदावर्ते, कैलास नेवासकर, आणि सुभाष मुळे यांनी आपली उपस्थिती दर्शवली.

इंजिनिअर सुनील पोरे यांच्या समाजकार्याचा गौरव करत त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या या यशाबद्दल समाजाच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!