माणगंगा शैक्षणिक संकुल, मासाळवाडी (म्हसवड)मध्ये संत गाडगे महाराज पुण्यतिथी व स्नेहसंमेलन सोहळा
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड (ता. माण) :
येथील माणगंगा शैक्षणिक संकुल, मासाळवाडीच्या वतीने श्री संत गाडगे महाराज पुण्यतिथी सोहळा, पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन सोहळा शनिवार, दि. २१ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता भव्य उत्साहात साजरा होणार आहे.
कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून मा. महेश देवकाते,( तालुका कृषी अधिकारी,तुळजापूर लोहरा,) मा. साईनाथ वाळेकर साहेब,( उपशिक्षणाधिकारी सातारा ) मा. सखाराम बिराजदार,( पोलीस निरीक्षक म्हसवड ) आणि मा. डी. वाय. ओंबासे ( शासकीय औद्योगिक केंद्राचे प्राचार्य पंढरपूर, दहिवडी, अकलूज ) यांची उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मा. नितिन दोशी (चेअरमन, अहिंसा नागरी सहकारी पतसंस्था व मा.नगराध्यक्ष, म्हसवड नगरपरिषद) सांभाळतील.
प्रमुख उपस्थिती:
मा. लक्ष्मण पिसे,( गटशिक्षणाधिकारी माण ), केंद्रप्रमुख मा. दीपककुमार पतंगे ( केंद्रप्रमुख म्हसवड ) , दादासाहेब कोडलकर (सचिव माणदेश इन्स्टिट्यूटचे ) यांचा समावेश आहे.
निमंत्रक:
कार्यक्रमाचे निमंत्रक डॉ.वसंत मासाळ (अध्यक्ष ), सुखदेव मासाळ (उपाध्यक्ष ), नारायण हरिबा(सचिव ), रावसाहेब मासाळ(व्यवस्थाकीय संचालक ), सौ. सविता मासाळ ( व्यवस्थाकीय संचालक )तसेच माणगंगा इंग्लिश मेडियम स्कूल व पॅरामेडीकल कॉलेजचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग आहेत.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी या सोहळ्यात सहभागी होऊन ज्ञानप्रद व प्रेरणादायी विचार ऐकण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.