मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून: माण तालुक्यातील धक्कादायक घटना आरोपीला जन्मठेपेची शिक्षा आणि 5000 रुपये दंड

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला)
दहिवडी (प्रतिनिधी):
माण तालुक्यातील कासारवाडी येथे 29 एप्रिल 2022 रोजी मटण खायला घालत नाही, या क्षुल्लक कारणावरून मुलाने स्वतःच्या वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालय वडूज यांनी आरोपी नटराज पांडुरंग सस्ते (वय 29) याला दोषी ठरवत जन्मठेप व 5000 रुपये दंड, दंड न भरल्यास 3 महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

 घटनेची दहिवडी पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी मयत पांडुरंग बाबुराव सस्ते (वय 70) यांचा मुलगा नटराज सस्ते याने 29 एप्रिल 2022 रोजी मला मटन खायला का घालत नाही असे म्हणून भांडत मयत पांडुरंग बाबुराव सस्ते यांचे अंगावर धावून गेल्याने ते घरातून बाहेर निघून भंडारदरा मळवी नावचे शिवारात पळत गेल्याने त्यांचे पाठोपाठ आरोपी नटराज पांडुरंग सस्ते हा घरातून हातामध्ये कुऱ्हाड घेऊन त्यांचे पाठोपाठ जाऊन भांडारदरा मळवी शिवारात हातातील कुऱ्हाडीने मयत यांचे डोक्यात, मानेवर कुऱ्हाडीने मारहाण करून गंभीर दुखापत करून खून केला अशी खबर आरोपीची आईने (मयताची पत्नी)  दहिवडी पोलीस ठाण्याला दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.

दहिवडी पोलिसांनी भा.द.वि. कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करून सखोल तपास केला. तपास अधिकारी श्री. डी.डी. तुपे यांनी वैद्यकीय व कागदोपत्री पुरावे गोळा केले. तसेच, 12 साक्षीदारांचे जबाब नोंदवत दोषारोपपत्र दाखल केले.
सरकारी वकील श्री. अजित प्रताप कदम (साबळे) यांनी सरकारी पक्षातर्फे खटला लढवला. साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय पुरावे आणि घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांचा आधार घेत त्यांनी आरोपीच्या निर्दय कृत्याचा युक्तिवाद केला.

न्यायालयाचा निकाल:
मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. एन.एस. कोल्हे यांनी सरकारी वकिलांचा युक्तिवाद मान्य करून आरोपी नटराज पांडुरंग सस्ते (वय 29) रा. कासारवाडी ता. माण याला दोषी ठरवत आज दिनांक १६/१२/२४ रोजी जन्मठेप व 5000 रुपये दंड, दंड न भरल्यास 3 महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली.

या खटल्यात उपविभागीय पोलिस अधिकारी मा. अश्विनी शेंडगे, स.पो.नि. अक्षय सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले. तपास पथकात पो.उप.नि. दत्तात्रय जाधव, पो.कॉ. अमीर शिकलगार, विजयालक्ष्मी दडस, जयवंत शिंदे आणि दया खाडे यांचा विशेष सहभाग होता.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!