दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला)

दहिवडी:

मा. विधी सेवा समिती दहिवडी यांच्या निर्देशानुसार दिनांक १४ डिसेंबर २०२४ रोजी दहिवडी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या लोकअदालतीमध्ये न्यायालयातील चालू दिवाणी व फौजदारी प्रकरणे तसेच वादपूर्व प्रकरणांचा समावेश करण्यात आला होता.

सदर लोकअदालतीत एकूण ८८ प्रकरणांचा निपटारा सामंजस्य व तडजोडीच्या माध्यमातून करण्यात आला. यामध्ये दिवाणी कडील ७० प्रकरणे आणि फौजदारी कडील १८ प्रकरणांचा समावेश होता.

राष्ट्रीय लोकअदालतीचे पॅनेल प्रमुख म्हणून मा. श्री. एस.एस. गाडवे, दिवाणी न्यायाधीश क. स्तर दहिवडी यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. या उपक्रमाला पक्षकार आणि विधीज्ञ यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

न्यायालयाच्या वतीने अशा उपक्रमांच्या माध्यमातून तडजोडीच्या आधारे प्रकरणे निकाली काढण्याचा प्रयत्न होत असून, न्यायप्रक्रियेतील विलंब कमी करण्यासाठी लोकअदालती एक प्रभावी माध्यम ठरत आहेत. या यशस्वी आयोजनाबद्दल दहिवडी न्यायालय व विधी सेवा समिती यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!