*स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील यांना शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन*
म्हसवड : (अहमद मुल्ला )
जेष्ठ समाजसेविका व शिवशंकर बझार च्या चेअरमन स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील यांना 2023 मधील जागतिक दर्जाच्या शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.
मुंबई येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पुरस्कार सोहळ्यात विश्वशांतीदूत डॉ.सुधीर तारे यांनी सदरची घोषणा केली. यावेळी स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील यांचे छायाचित्र असलेल्या भारतीय डाक विभागाच्या टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले.
याप्रसंगी अफगाणिस्तानच्या वाणिज्य दूतावास झाकिया वर्दक, कोरियाचे वाणिज्य दूतावास ख्रिस हाँग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ.भीमराव आंबेडकर, नातसून दर्शना आंबेडकर, शून्य से शिखर फाउंडेशन च्या संस्थापिका डॉ.चंदेरकला सिंग, डॉ.हरजित सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना विश्वशांतीदूत डॉ.सुधीर तारे म्हणाले, गेली 33 वर्षातील स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या समाजसेवा, शिक्षण, पर्यावरण, आध्यात्म आशा विविध क्षेत्रातील अनमोल योगदानाची दखल घेऊन नॉर्वे आणि स्वीडन च्या नोबेल पुरस्कार समितीने स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील यांचे 2023 मधील शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन जाहीर केले आहे.