दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सरकारने गांभीर्यपूर्वक लक्ष न दिल्यास आंदोलनाचा इशारा

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

कराड प्रतिनिधी कुलदीप मोहिते

     स्वाभिमानी शेतकरी संघटना व दूध उत्पादक शेतकरी यांच्या वतीने शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष.प्रमोदसिंह जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली कराड तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची दूध दराबाबत आंदोलनात्मक दिशा ठरवण्यासाठी सप्तपदी मंगल कार्यालय कृष्णा कॅनॉल, सैदापूर येथे बैठक पार पडली.

           या बैठकीला शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने दुध उत्पादक शेतकरी व दूध संकलक उपस्थित होते. तेथूनच सर्वजण तहसीलदार यांना दूध दर वाढीसह इतर मागण्यांचे निवेदन देण्यासाठी तहसीलदार कार्यालयात गेले.
१५ दिवसांत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर दिनांक २३/१२/२०२४ ” राष्ट्रीय किसान दिन” या दिवसापासून संपूर्ण सातारा जिल्ह्यात बेमुदत दूध बंद आंदोलन करण्याचे व सातारा जिल्ह्यातून इतर जिल्ह्यातील सर्व प्रकारची दूध वाहतूक बंद करण्याचा इशारा निवेदनातून दिलेला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यावेळी कप्तान इंद्रजीत जाधव उंब्रज सरपंच राहुल साळुंखे केवळ प्रवीण चव्हाण कोणेगाव प्राध्यापक महेश पाटील यासह मोठ्या संख्येने दूध उत्पादक व दूध संकलन उपस्थित होते


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!