क्रांतिवीर शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतली हेलिकॅप्टर ची तांत्रिक माहिती.

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड… प्रतिनिधी
म्हसवड येथे क्रांतिवीर शाळे नजीक उतरलेल्या हेलिकॉप्टरची तपशीलवार तांत्रिक माहिती क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळेतील विद्यार्थ्यांनी एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून घेतली. या निमित्ताने आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळाल्याने चिमुकले विद्यार्थी बेहद्य खुश झाले.
एका प्रासंगिक कामानिमित्त खाजगी कंपनीचे हेलिकॉप्टर म्हसवड येथे आले होते. सुदैवाने सदर हेलिकॅप्टर क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळे नजीक उतरले होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांची दूरदृष्टी व संकल्पनेतून विद्यार्थ्यांना हेलिकॅप्टर उतरलेल्या ठिकाणी भेट देण्याचे ठरवून लगेच हेलिकॅप्टर पायलट ची परवानगी काढण्यात आली.
या निमित्ताने पायलट कॅप्टन अनुज कुमार पाचोरी व इंजिनीयर दिपक पाटील यांनी विद्यार्थ्यांना हेलिकॅप्टर ची तपशीलवार सविस्तर माहिती दिली.

हेलिकॉप्टरचा प्रकार.,कॉकपीट, डॅशबोर्ड , आसन क्षमता ,, इंजिनचा प्रकार आणि कंपनी , नियमित देखभाल दुरुस्ती, उंचीनुसार उड्डाण क्षमता , हेलिकॉप्टर चे प्रकार, नॉटिकल मैल द्वारे वेग मोजणे, उत्पादन करणारी कंपनी व देश, इंधन प्रकार व मिळण्याचे ठिकाण, इंधन टाकीची क्षमता तीनशे लिटर , प्रकारानुसार किंमत तसेच हेलिकॅप्टर ची विशेष उपयुक्तता याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली.
या निमित्ताने दहा विद्यार्थ्यांनी पायलट पाचोरी यांना प्रश्न विचारले असता पाचोरी यांनी विद्यार्थ्यांच्या जिज्ञासा बद्दल समाधान व्यक्त केले. हेलिकॅप्टर पायलट किंवा वैमानिक होण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता तसेच, अनुभव याबाबतची माहिती इंजिनियर दिपक पाटील यांनी दिली. संस्था अध्यक्ष व मुख्याध्यापकांच्या दूरदृष्टीतून सुरू असणाऱ्या क्रांतिवीर शाळेतून वैमानिक तयार व्हावेत अशी अपेक्षा पायलट पाचोरी यांनी व्यक्त केली.
संस्था अध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर यांचे हस्ते शाळेच्या वतीने हेलिकॉप्टर पायलट व इंजिनियर यांचा सन्मान करण्यात आला. मान्यवरांचे आभार शिक्षक अनिल काटकर यांनी व्यक्त केले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!