“दोन दशकांनंतरची भेट: न्यू इंग्लिश स्कूल खडकी पाटोळेच्या 2003-04 च्या माजी विद्यार्थ्यांचा आनंददायी स्नेह मेळावा”
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड : प्रतिनिधी
20 वर्षांनंतर न्यू इंग्लिश स्कूल खडकी पाटोळे येथील सन 2003 व 2004 च्या इयत्ता 10 वीच्या माजी विद्यार्थ्यांनी स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमामध्ये तब्बल 28 विद्यार्थी सहभागी झाले होते, ज्यांनी पाच तासाच्या या स्नेह मेळाव्यात आनंदात सहभागी होत जुने दिवस पुन्हा अनुभवले.

कार्यक्रमात श्री चिंचकर सरांची उपस्थिती होती, ज्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. श्री चिंचकर सरांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी शालेय जीवनाच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी एकमेकांचे अनुभव, गमतीजमती, आवडलेल्या प्रसंगांची चर्चा करत स्मरणरंजन केले.


