गुन्हा नियंत्रणात: अवैध दारू निर्मिती प्रकरणात आरोपीस अटक
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड :
म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत,महादेवमळा येथे माणगंगा नदीच्या काठावर अवैध हातभट्टीची दारू तयार करताना आरोपी सखाराम महादेव जाधव (वय 45 वर्षे, रा. म्हसवड) यास पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 65 (क)(ड)(ई) अंतर्गत या गुन्ह्यात आरोपीवर कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, म्हसवड पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल अनिल विलास वाघमोडे यांनी गुरुवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी छापा टाकला. छाप्यात आरोपीकडे एकूण 23,250 रुपये किंमतीचा अवैध माल जप्त करण्यात आला.


