कराड उत्तरमध्ये राजकीय तापमान चढले: मनोज घोरपडे विरुद्ध बाळासाहेब पाटील यांच्यात निवडणुकीची चुरस

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

सातारा कराड कुलदीप मोहिते

        कराड उत्तर मध्ये विधानसभेचे वातावरण तापले आहे महाविकास आघाडी व महायुतीमधून उमेदवारी जाहीर झाली आहे अंतिम टप्प्यात उमेदवारी महायुतीमधून मनोज घोरपडे यांना देण्यात आली तर महाविकास आघाडीतून आमदार बाळासाहेब पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कराड उत्तर मतदार संघ चार तालुक्यात विभागला आहे त्यामुळे मतदारसंघात इच्छुक उमेदवार जास्त प्रमाणात संख्या होती
     अखेर महायुतीमधून मनोज घोरपडे यांना उमेदवारी दिली आहे त्यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करीत अर्ज दाखल केला यावेळी कराड उत्तर मध्ये परिवर्तन अटळ आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर बाळासाहेब पाटील यांनी अर्ज दाखल केला यावेळी त्यांनी सांगितले की कराड उत्तर मतदारसंघ यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचा मतदारसंघ आहे जनता आमच्या पाठीशी ठामपणे उभी आहे जनता महाविकास आघाडीच्या बाजूने व आमच्या बाजूने कौल देईल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तत्पूर्वी यशवंतराव चव्हाण समाधी व पी डी पाटील यांना अभिवादन करून मोठ्या शक्ती प्रदर्शनाने अर्ज दाखल केला मतदारसंघाच्या प्रत्येक गावात अर्जाची दाखल करण्याची चर्चा होती कराड उत्तरची निवडणूक यंदा आरोप प्रति आरोप यांच्यामुळे गाजणार आहे. पाण्याचा प्रश्न, विकास कामाचे, बोर्ड कारखान्याचे प्रश्न उसाचे प्रश्न ,व विकास कामावरून आरोप प्रत्यारोप जोरदार होणार आहेत असे जाणकार अभ्यासक सांगतात ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापले आहे महायुती मधून जनतेचा कौल आपल्या बाजूने आहे असा विश्वास विराट शक्ती प्रदर्शन केल्यानंतर कार्यकर्त्यांनी व्यक्त केला तर मतदारसंघात प्रत्येक घटकापर्यंत आम्ही सेवा केली आहे त्यामुळे जनता आम्हाला पुन्हा एकदा संधी देईल व महाविकास आघाडीचाच कराड उत्तर चा आमदार असेल असा विश्वास कार्यकर्ते नेते सांगत आहेत मतदार कुणाच्या बाजूने कौल देणार दिवाळीत विजयाची कुणाचे फटाके फुटणार सध्या तरी आरोप प्रति आरोप फटाके फुटणार असे एकंदरीत चित्र दिसत आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!