राजकुमार महालिंग डोंबे यांची युवक क्रांती दलाच्या राज्य कार्यकारणीत राज्य सहकार्यवाहक पदी निवड.

बातमी Share करा:

म्हसवड प्रतिनिधी ;
 गेली 40 वर्ष राजकुमार डोंबे हे सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन   त्यांची युवक क्रांती दलाच्या राज्य कार्यकारणीत राज्य सहकार्यवाहक म्हणून निवड करण्यात आली त्यांनी अनेक विविध सामाजिक  प्रश्नांना  वाचा फोडलेली आहे सुशिक्षित बेरोजगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत राष्ट्रीयकृत बँकेच्या विरोधात अनेक वेळा आंदोलन केली आहेत  अत्याचारित पीडित महिलांना न्याय दिलेला आहे मोठ्या कंपन्याचा भ्रष्टाचार  त्यांनी उघड केलेला आहे, मरीआई गाडीवाले, देऊळवाले या समाजाला रेशन कार्ड पहिल्यांदा मिळवून देण्याचे काम त्यांनी केलेले आहे.
राज्यभरातील शेकडो महिलांवर होत असलेल्या अन्यायाविरोधातही त्यांनी वेळोवेळी आवाज उठवत महिलांना न्याय मिळवून दिला आहे. सुशिक्षित बेरोजगारांना शासकीय कर्ज मिळवून देणे, विधवा, परितक्त्या महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, बेरोजगारांसाठी मेळावे घेणे, बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश करणे, गर्भलिंग चाचणी करणारे रॅकेट उजेडात आणणे, व्यसनमुक्ती साठी प्रसार करणे आदी कामे ते आज ही करीत असुन गत ४० वर्षापासून त्यांनी विविध संघटनेच्या माध्यमातून ४५ आंदोलने करीत शासनाला जाब विचारला आहे. तर माण तालुक्यातील स्टॅपवेंडरचा घोडाळा त्यांनी बाहेर काढला या शिवाय राष्ट्रीकृत बॅंकेच्या  विरोधात सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील त्यांच्या हलगी नाद आंदोलनाने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले होते, तर मनमाड येथे जावून त्यांनी खोटा नागमनी विकणारी टोळी उघडकीस आणण्यात पोलीसांना मोठी मदत केली होती. म्हसवड येथेही एका हमाली करणाऱ्या व्यक्तीस त्याच्याच नातेवाईकांनी त्याची केलेल्या आर्थिक फसवणुकीबद्दल आवाज उठवत त्याला न्याय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. डोंबे यांच्या अशाच अनेक सामाजिक कार्याबद्दल   यांना विविध पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत .सातारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला होता.
 पोलीस अधीक्षक नवनाथ ढवळे यांनी त्यांच्या कार्याबाबत प्रशस्तीपत्र दिलेले आहे .
जिल्हा उद्योग केंद्र औरंगाबाद ,जिल्हा उद्योग केंद्र सातारा यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन सन्मानपूर्वक पुरस्कार दिले आहेत. तसेच जिल्हाधिकारी सातारा यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन विशेष गौरव प्रमाणपत्र दिले आहेत सदरचे कार्य डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्या व अन्वर भाई राजन यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप बर्वे राज्य  कार्यवाहक यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!