उंब्रज पोलिसांचा दमदार कारवाईने समाजात दहशत माजवणाऱ्यांचा पाडाव

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
उंब्रज (प्रतिनिधी): श्रीकांत जाधव

गुन्हेगारांचे उदात्तीकरण करून समाजात दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना उंब्रज पोलिसांनी ठोस उत्तर दिले आहे. प्राणघातक हल्ल्याप्रकरणी कारागृहात असलेल्या गुन्हेगाराचा फोटो झळकवत, गावात रॅली काढून त्याचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आठ जणांवर कडक कारवाई करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील तीन मोटारसायकलीसह अन्य साहित्य जप्त केले आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत अजय चव्हाण, विनायक निकम, प्रणव चव्हाण आणि इतर संशयितांना ताब्यात घेण्यात आले. सोशल मीडियावर गुन्हेगाराचे उदात्तीकरण करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या सूचनेनुसार, या घटनेत गुन्हेगारांच्या उदात्तीकरणाला आळा घालण्यासाठी विशेष पथक कार्यरत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समाजात दहशत पसरवण्यासाठी काढलेल्या रॅलीत जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करण्यात आले होते. त्यामुळे याप्रकरणी कारवाई करून या प्रकरणाचा अहवाल तयार करण्यात आला आहे. पोलिसांनी समाजात दहशत माजवणाऱ्यांना सोडणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला आहे.

उंब्रज पोलिसांच्या या ठोस कारवाईचे नागरिकांनीही स्वागत केले आहे, ज्यामुळे कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचे महत्त्वपूर्ण योगदान अधोरेखित झाले आहे


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!